ईदच्या पवित्र निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला पाच कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांना विशेष गिफ्ट दिले आहे. या निधीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या विविध विकासकामांसाठी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.
सातारा शहर आणि जावली तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या विविध कब्रस्थान आणि मस्जिद परिसरातील विकासासाठी या निधीचा उपयोग केला जाईल. यामध्ये सातारा शहरातील गेंडामाळ नाका येथील कब्रस्थानासाठी पाणी टाकी, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ता, सुशोभीकरण, शेड बांधणे, विद्युतीकरण आणि मस्जिद परिसरातील इतर विकासकामे समाविष्ट आहेत.
तसंच, जावली तालुक्यातील कुडाळ, सरताळे, रायगाव, आणि मेढा येथील कब्रस्थान आणि मस्जिद परिसरातील विविध विकासकामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शेड बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, सुशोभीकरण, शौचालय बांधणे आणि रस्ता निर्मिती यांसारखी कामे समाविष्ट आहेत.
निधी मंजूर केल्याबद्दल समीर आतार,जब्बार पठाण, सादिक सय्यद,मोहसीन शेख ,इमरान आतार यांनी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे आभार मानले